शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हर... हर..२. महादेवचा गजर निनादला

By admin | Updated: February 18, 2015 00:52 IST

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणांवरून भाविक यात्रेत सहभागी झाले असून ...

चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणांवरून भाविक यात्रेत सहभागी झाले असून आज पहाटेपासूनच भाविकांनी ‘हर... हर... महादेव’च्या गजरात मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा आयोजन समित्यांनी व्यवस्था केली असून भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनानेही यात्रा स्पेशल बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.वरोरा : तालुक्यातील भटाळा गावाच्या टेकडीवर असलेल्या हेमाडपंंथी शिवमंदिरातील यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही जत्रा तीन दिवस चालणार आहे.वरोरा शहरापासून १६ किमी अंतरावरील भटाळा गावानजकीच्या टेकडीवर हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला कळस नाही. महाशिवरात्री पासून भटाळा गावातील मंदिरात तीन दिवसीय यात्रा भरत असते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गोपालकाल्याने यात्रेचा समारोप होतो. दर्शन घेण्याकरीता वरोरा, चिमूर, भद्रावती तसेच वर्धा जिल्ह्यातील गिरड, समुद्रपूर, हिंगणघाट, गडचिरोली, नागपूर येथील भाविक मोठ्या प्रमाणात येते आले. यात्रेकरुनकरीता वरोरा एसटी आगाराने तिन्ही दिवस विशेष बसगाड्यांची सोय केली आहे. या बसगाड्या भटाळा- वरोरा या मार्गावर फेऱ्या मारत असून काही बसेस व्हाया टेमुर्डा तर काही बसेस भटाळापर्यंत सोडल्या असल्याने भाविकांची सोय झाली आहे. भाविकांना गरज पडल्यास आरोग्य सेवा तत्काळ मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसारचे आरोग्य पथक यात्रेत कार्यरत आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक खासगी वाहनाने भटाळा येथे येत असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या दोन्ही बाजुस वाहन तळाची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी भटाळा गावात पहारा देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)