शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल; म्हातारपणाची रक्कमही मिळता मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तटपुंजे वेतन दिले जाते. तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कपात केली जाते; परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत त्याची रक्कम दिली जात नाही. मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची तसेच ग्रच्युइटीची रक्कम थकीत आहे. 

ठळक मुद्देविभागीय कार्यालयात चकरा : कोरोनात आर्थिक अडचणींचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची देयके बराच कालावधीपर्यंत प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तटपुंजे वेतन दिले जाते. तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कपात केली जाते; परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत त्याची रक्कम दिली जात नाही. मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची तसेच ग्रच्युइटीची रक्कम थकीत आहे. संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वत:च्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहे. परिणामी, पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत; मात्र अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत, ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. तसेच रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात; मात्र मागील वर्षी निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही मिळाली नाही. 

नोकरीत असतानाही आणि निवृत्तीनंतरही फरफटपूर्वीच तटपुंजे वेतन दिले जात असल्याने नोकरी करतानाही आर्थिक ताण सहन करावा लागतो. सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या हक्काचे पैसे वेळवर मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोर जावे लागते.-चालक

इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम कमी आहे. त्यातही ही रक्कम थकित राहत असून वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.- वाहक 

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांनाही समस्या कायमआरोग्याच्या समस्याने काही कर्मचारी सेवानिवृत्ती घेतात. त्या कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे अध्यादेश आहेत. मात्र सेवानिवृत्ती होऊन बराच कालावधी झाल्यानंतर लाभ देण्यात आला. कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे उत्पन्न मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

 

टॅग्स :state transportएसटीPensionनिवृत्ती वेतन