शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना

By admin | Updated: March 11, 2016 01:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती संविधानाच्या माध्यमातून दिली.

खुशाल तेलंग यांचे प्रतिपादन : समतापर्व रॅलीचे विसापूर व नांदगाव (पोडे) येथे स्वागतबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती संविधानाच्या माध्यमातून दिली. मात्र विद्यमान सरकार संविधानाला नाकारण्याची भूमिका पार पाडताना दिसत आहे. त्यांची तशी मानसिकता प्रकट होत आहे. लोकशाही प्रगल्भ होत असताना हुकूमशाहीच्या वल्गना केल्या जात आहे. संविधानाच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाकडे वाटचाल सुरु असून सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करीत आहे, असे प्रतिपादन समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचे संयोजक खुशाल तेलंग यांनी मंगळवारी नांदगाव (पोडे) व विसापूर येथील कार्यक्रमात केले.अखिल भारतीय समता सैनिक दल जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचा चंद्रपूर येथून प्रारंभ झाला. या रॅलीचे स्वागत बल्लारपूर, विसापूर व नांदगाव (पोडे) येथे करण्यात आले. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ही रॅली ७ मार्च पासून ८ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील १२५ ठिकाणी सामाजिक जागृती व प्रबोधनातून संवाद साधणार आहे. रॅली सोबत समता सैनिक दलाचे पथक व्यवस्था सांभाळत आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॅलीचे आगमन झाले. येथे सामाजिक कार्यकर्ते तुळशिराम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल तेलंग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सचिव जी. के. उपरे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, पी. एल. शेंडे, मनोहर जयकर, पंढरी मानकर, प्रजेश घडसे, भाऊराव तुंबडे यांची उपस्थिती होती.दरम्यान समता सैनिक दलाच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. प्रास्ताविक प्रजेश घडसे यांनी केले. रिता जिलटे, जी. के. उपरे व प्रमोद देठे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन व आभार भाऊराव तुंबडे यांनी केले. यावेळी समाज बांधवाची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)