शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकास ग्रामविकास अधिकाऱ्याचे पाठबळ

By admin | Updated: December 26, 2015 01:25 IST

ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने अतिक्रमणाधारकाला सहकार्य करीत ते काढल्याची खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

शासनाची दिशाभूल : कारवाईसाठी सिद्दीकी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनघुग्घुस: ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने अतिक्रमणाधारकाला सहकार्य करीत ते काढल्याची खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कर्तव्यास कसूर करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास कारवाई करण्याची मागणी इबादूल हसन सिद्दीकी यांनी केली आहे.ग्रामपंचायतीच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर शेख मुशीम शेख यांचे घर आहे. त्यांनी सिमेंट रस्त्यावर वॉलकंपाऊंडचे बांधकाम केले. अतिक्रमणाबाबत १५ एप्रिल २०१३ रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याऐवजी अतिक्रमणधरकास प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे प्रकरण सिद्दीकी यांनी लोकशाही दिनात ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनंत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रस्त्यावर अतिक्रमण असल्याचा अहवाल सीईओंकडे सादर केला. त्यानंतर सीईओंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. अहवालानुसार अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी यारेवार यांना दिले. सात दिवसात अतिक्रमण हटवून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र त्यांनी अतिक्रमण न हटविता ते हटविण्याची खोटी माहिती वरिष्ठांकडे सादर केली. याच्या आधारे सीईओनी प्रकरण निकाली निघाल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र सिद्दीकी यांंना पाठविले. तेव्हा हा सारा प्रकार उजेडात आला, असे सिद्दिकी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)