शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते. कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात दोन हजार १८२ कामे सुरु : ३३ हजार कामगारांना मिळाले काम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केली. ४८४ ग्रामपंचायतीतील २ हजार १८२ कामे सुरु झाली आहे. त्यातून जिल्ह्यातील ३३ हजार ५०९ मजुरांच्या हाताला कामे मिळाली.बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते.कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे जॉबकार्डधारकांकडून कामाची मागणी वाढली त्यानुसार जिल्ह्यातील ८५५ ग्रामपंचायतपैकी ४८४ ग्रामपंचायतमध्ये दोन हजार १८२ कामाला सुरुवात झाली आहे. विहिरींचे बांधकाम, तलाव खोलीकरण, शेततळे बांधकाम, गाळ उपसा, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामावर सुमारे ३३ हजार ५०९ कामगार काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामे रोजगार बंद असताना रोहयोची कामे मजुरांना दिलासा देणारी ठरली आहेत.सोशल डिस्टन्सिंग पालन बंधनकारकदेशात कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासनाने विविध प्रकारची नियमांवली तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोहयोची कामे सुरु झाली आहेत. त्या कामावर मजूरही कार्यरत आहेत. काम करताना कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना मास्क बंधणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे.शासनाच्या आदेशानुसार कामाच्या मागणीचा विचार करुन कामे सुरु करण्यात आली आहेत. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- किरणकुमार धनवाडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो, चंद्रपूर.