अवैध दारुविक्रीविरोधात इंदिरानगरवासीयांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST2021-05-27T04:30:25+5:302021-05-27T04:30:25+5:30

चंद्रपूर : येथील इंदिरानगर व स्वामी विवेकानंद चौकात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध विक्री केली जाते. याविरोधात येथील नागरिकांनी एल्गार ...

Elgar of Indiranagar residents against illegal sale of liquor | अवैध दारुविक्रीविरोधात इंदिरानगरवासीयांचा एल्गार

अवैध दारुविक्रीविरोधात इंदिरानगरवासीयांचा एल्गार

चंद्रपूर : येथील इंदिरानगर व स्वामी विवेकानंद चौकात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध विक्री केली जाते. याविरोधात येथील नागरिकांनी एल्गार पुकारुन अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१५ पासून दारुविक्री बंद आहे. परंतु, शहरातील इंदिरानगर, विवेकानंद चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरु शाळेजवळ मोठ्या प्रमाणात दारुची अवैध विक्री केली जाते. या दारूविक्रेत्याला परिसरातील नागरिकांनी रोकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अश्लील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देतो. याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी केली. यावेळी रेखा लोहांडे, अशा हिंगे, संगीता वंगलवार, शशिकला चौधरी, कुसुम बावणे, अरुणा गुणवार, संगीता नवले, आशा खोब्रागडे, ज्योती सोनटक्के, रेखा मडावी, अल्का उपचरे, कविता मडावी, रजना धंदरे, ललिता वराडे, सीमा वराडे यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Elgar of Indiranagar residents against illegal sale of liquor