शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासच्या ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक

By admin | Updated: February 27, 2017 00:40 IST

नागभीड कृउबासच्या सात जागा आधिच अविरोध निवडून आल्याने आता ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक होत आहे.

नागभीड कृउबास निवडणूक : सात संचालक अविरोध नागभीड : नागभीड कृउबासच्या सात जागा आधिच अविरोध निवडून आल्याने आता ११ जागांसाठी ५ मार्च रोजी निवडणूक होत आहे. सहकारी संस्था गटातील सर्वच सातही सर्वसाधारण जागा अविरोध आल्याने या निवडणुकीतील रसच निघून गेल्याच्या प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत.नामांकन परत घेण्याचे दिवशी सहकारी संस्था गटातील अनेक उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने सहकारी संस्था गटातील सातही संचालक अविरोध निवडून आले. यात भाजपच्या सहा तर काँग्रेसच्या एका संचालकाचा समावेश आहे. आता सहकारी संस्था गटातील दोन महिला संचालकांकरिता एक इतर मागासवर्गीय आणि एक विमुक्त व भटक्या जमातीमधील संचालकाकरिता निवडणूक होणार आहे.यासोबतच ग्रामपंचायत मतदार संघातील चार संचालक, अडते, व्यापारी व प्रक्रियादार मतदार संघातून दोन हमाल मापारी मतदारसंघातून एक संचालक निवडून द्यायचा आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आणि १० फेब्रुवारी रोजी सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात संचालक अविरोध निवडून आले असले तरी जि.प. व पं.स.च्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे या निवडणुकीची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही.आता जि.प. आणि पं.स. निवडणुकीची रणधुमाळी संपल्याबरोबर बाजार समितीच्या निवडणुक चर्चेने आणखी उचल खाण्यास सुरुवात झाली आहे, अविरोध निवडून आलेल्या सात जागांपैकी सहा जागा भाजपच्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सहकारी संस्था मतदार संघ, हमाल मापारी मतदार संघ आणि अडते व्यापारी मतदार संघातही भाजप पुरस्कृत पॅनलचे पारडे जड असल्याची चर्चा असून ग्रामपंचायत मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलल्या जात आहे.नुकत्याच झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस जणांचा आत्मविश्वास वाढला आहे. इतर मतदार संघात नाही, पण ग्रामपंचायत मतदार संघात काँग्रेस लक्ष केंद्रीत करुन शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)