शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

चंद्रपूर : नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील ६२९ ...

चंद्रपूर : नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायती आहेत. या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणानंतर अनेक प्रस्थापितांना फटका बसला होता. आता निवडणूक जाहीर झाल्याने तेदेखील नव्याने मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. गावपातळीवरील पुढाºयांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले. दरम्यान, ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.

बॉक्स

राजकीय हालचालींना वेग

आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यापूर्वीच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती.पण आता सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार असल्याने आणि २३ डिसेंबर २०२० पासूनच नामांकन दाखल करण्यास सुरूवात होणार असल्याने येत्या दोन चार दिवसांत गावपातळीवरील राजकीय हालचाली चांगल्याच गती घेतील, असे संकेत आहे.

बॉक्स

असा असणार निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारवारांना चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

बॉक्स

आचारसंहिता लागू

जिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांवर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींमध्ये ११ डिसेंबर २०२० पासून आचारसंहिता अंमलात आणण्यात आलेली आहे.

बॉक्स

संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन होईल दाखल

या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. नामनिर्देशन पत्र २३ ते ३० डिसेंबर २०२० (२५, २६ व २७ डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळून) या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.