शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीअभावी तालुक्यातील शेतमजुरांवर आर्थिक संकट

By admin | Updated: July 3, 2014 23:30 IST

राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने

ब्रह्मपुरी : राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर आर्थिक संकट आले आहे.उन्हाळ्यातील शेतीच्या मशागतीनंतर पेरणीच्या वेळी जमा केलेल्या मजुरीच्या रकमेवर शेतमजुरांचे अर्थकारण अवलंबून असते. खरिपात पेरणी, निंदन, खरपन, ढवरणी, कापनीपर्यंत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो. पेरणी न झाल्याने साहजिकच शेतमजुरांसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सुरुवातीचाच काळ संघर्षमय ठरल्याने संपूर्ण वर्षाचे अर्थकारणच बिघडण्याची चिन्हे असल्याचे शेतमजुरांनी सांगितले. पुरुषांना २०० रुपये प्रतिदिन तर महिलांना १०० रु. असे शेतमजुरीचे दर आहेत. पाऊस येण्याच्या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्रामीण भागाचा आढावा घेतला. ब्रह्मपुरी वरुन - वडसाकडे जाताना १० किमी वर हरदोलीजवळ एका शेतात पेरणी करणारा शेतमजूर निलकंठ ज्ञानेश्वर टिकले यांनी शेतमजुराचे अर्थकारण मांडले. पेरणीच्या दिवसात एक एकर शेतात बियाणे पेरण्यासाठी एक हजार रुपयापर्यंत मोबदला मिळतो. याकरिता बैलजोडी आणि काही मजूर लागत असतात.मात्र सध्या पाऊसच नसल्याने पेरणीची कामे फारसी झाली नाहीत. गावोगावी जाऊन शेतमजुरांचा शोध घ्यावा लागतो.. या कामाकरिता कुटुंबातील सर्वच सदस्यांचा सहभाग असतो. तेवढीच अधिक मजुरी मिळत असते. (प्रतिनिधी)