शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भेजगाव परिसरात धानपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 7, 2015 02:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

शेतकरी त्रस्त: कृषी विभाग उदासीन, उत्पादनात घट येण्याची शक्यताभेजगाव: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावर्षी तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविली. कमी अधिक झालेल्या पावसाने रोवणी उशिरा झाली. १५ दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या उष्ण- दमट वातावरणाने भेजगाव परिसरातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी पीक वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करीत आहेत.गतवर्षी झालेली उत्पन्नातील घट आणि धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. मात्र यातून सावरत शेती आज ना उद्या पिकेल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या. पैशाची जुळवाजुळव केली. बि-बियाणे खरेदी केले. मजुरांना मागेल ती मजुरी देऊन रोवणी आटोपली, मात्र धानपिक ऐन गर्भात असतानाच धानपिकांवर तुळतुळा, करपा, पांढरा रोग, लष्करी अळी आदी रोगांनी आक्रमण केल्याने बळीराजावर किटकनाशक फवारणीचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर औषध फवारणीचा डब्बा अन् डोळ्यात अश्रुच्या धारा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.भेजगाव परिसरातील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा तलावाच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने या तलावाची स्थिती चिंताजनक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात नाममात्र टाकून दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जलपूजनाच्या केलेल्या स्पर्धेत शेतकरी सुखावला असला तरी या दोन्ही नेत्यांनी पुजलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेवर पोहचेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या परिसरात पाण्याची दुसरी सोय नसल्याने राब-राब राबुनही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागणार आहे. आर्थिक गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांची शेती पिकेल अशी शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवत असला तरी शेतकरी संकटात सापडला असताना प्रशानाने औषध उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसून शासनाचे उदासिन धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. (वार्ताहर)