शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

पानठेला चालकाच्या आत्महत्येमुळे दारुसमर्थक रस्त्यावर

By admin | Updated: March 26, 2015 00:50 IST

येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने

चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने आर्थिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दारुसमर्थकांसह दारुविक्रेत्यांनी आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. नितेशच्या मृतदेहासह हे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या समयसुचकतेमुळे परिस्थिती निवळली.येथील सिस्टर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला नितेश आमटे याचा दुर्गापूर परिसरातील एका बारजवळ पानठेला आहे. पानठेल्याच्या बळावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र एप्रिलपासून जिल्ह्यात दारुबंदीहोणार असल्याने तो अस्वस्थ होता. या नैराश्यापोटीच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दारूविक्रेत्यांनी केला आहे. बुधवारी नितेशने घरी गळफास लावून आत्त्महत्या केली. या घटनेची माहिती जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. निलेशच्या आत्महत्येमागे केवळ दारुबंदी हेच कारण आहे, असे समजून दारुविक्रेते, समर्थक तसेच कामगार नेत्या अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी शासनाने दारुदुकानात काम करणाऱ्यांचे पुनर्वसन करावे, मृतकाला आर्थिक मदत द्यावी, दारुबंदी निर्णयाबाबत पुनर्विचार करावा आदी मागण्याकरित मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात अडवून ठेवला. त्यानंतर मोठ्या संख्येने दारु दुकानदार, समर्थक जमा झाले. (नगर प्रतिनिधी)आधी पुनर्वसन, नंतर करा दारुबंदीदरम्यान या घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, आधी कामगारांचे पुनर्वसन करा त्यानंतर दारूबंदी करा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी होणार आहे. यामुळे या व्यवसायावर आधारिक अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या दुकानामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्धेअधिक वय झाल्यानंतर त्यांना कुठेही काम मिळणार नाही, त्यामुळे शासनाने प्रथम कामगारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली.