शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देयके अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम बंद

By admin | Updated: February 23, 2016 00:37 IST

शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडशासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे. परिणामी गेल्या तीन-चार वर्षापासून या कालव्याचे काम बंदच आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. सहा ते सात वर्षापूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीतही करण्यात आली आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले. हे काम करण्यासाठी मेंढा (किरमिटी) येथे एफएसी नवेगाव पांडव येथे एचसीसी, खैरीचक येथे बी.टी.पाटील आणि महालक्ष्मी तर कोदेपार एसएमएस या कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुद्धा सुरु केले. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरु ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील एचसीसी या कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले. आता या बाबीस तीन ते चार वर्षाचा कालावधी होत आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. आता तरी या कालव्याचे मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण नव्या शासन काळातही या कालव्याच्या नशीबी असलेला भोग संपले असे दिसत नाही. खरे तर या कालव्याचा नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतीला सकृतदर्शनी काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातील गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इंरिगेशन सारखी योजना कार्यान्वीत होऊ शकते.कंपन्यांची अवस्था बिकटकंत्राटदार कंपन्यानी काम बंद केले असले तरी काही कंपन्यांचे युनिट अद्यापही सुरु आहेत. खैरी चक आणि मेंढा (किरमिटी) येथील कंपन्याचे याबाबत उदाहरण देता येईल. पण शासनाकडून केलेल्या कामाचे देयके मिळत नसल्याचे या कंपन्यांची अवस्था अडकित्यामधील सुपारी सारखी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ठरताहेत भारखरे तर या कालव्याच्या देखरेखीसाठी सायगाटा, नागभीड येथे वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. कार्यकारी उपविभागीय अभियंत्यांच्या अनेक जागा भरण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. पण कामच नसल्याने या वसाहती आणि नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी भूईला भार ठरत आहेत.