शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रूग्ण वाढल्याने कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

सभागृह मालक व व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यातून परवागनी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला परवागनी मिळाल्यानंतर संबंधित ठाणेदारांनी कार्यक्रमस्थळी एक पोलीस शिपाई नियुक्ती करून मास्क व सामाजिक अंतर पाळण्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता विवाह व अन्य कार्यक्रमासाठी असलेली ५० व्यक्तींची मर्यादा कायम ठेवून नाटक व सिनेमा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर सभा, बैठका, सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात संबंधित बंदिस्त सभागृह व मोकळ्या जागेच्या क्षमतेतील २५ टक्के अथवा १०० पैकी कमी लोकांच्या उपस्थिती या अटीवरच कार्यक्रम करावे. सभागृह मालक व व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यातून परवागनी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला परवागनी मिळाल्यानंतर संबंधित ठाणेदारांनी कार्यक्रमस्थळी एक पोलीस शिपाई नियुक्ती करून मास्क व सामाजिक अंतर पाळण्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या. प्रशासकीय इमारतींच्या परिसरात येताना नागरिकांनी मास्क लावावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

२२ रूग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यूजिल्ह्यात २४ तासात २२ कोरोना रूग्णांची नव्याने भर पडली तर एका बाधिताचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार २७८ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७७९ झाली आहे. सध्या १०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. आज मृत झालेल्यामध्ये आनंदवन वरोरा येथील ७६ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९४ बाधितांचे मृत्यू झाले.

सभागृह, मंगल कार्यालयांना दंडआदेशाचे उल्लंघन केल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागा मालक, व्यवस्थापकावर पाच हजार दुसऱ्यांदा १० हजार व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २० हजार दंड आकारण्यात येईल. याशिवाय सभागृह, मंगल कार्यालय व जागा सील करणे व गुन्हा दाखल करण्यात येईल. आयोजकांवरही १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस