शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कचराळ्याच्या बंद घाटातून रेतीचा उपसा

By admin | Updated: December 20, 2014 00:56 IST

पर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील

विनायक येसेकर भद्रावतीपर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील कचराळा नाल्यातील रेती उपशावर बंद घातली. याचा लिलाव होत नाही. मात्र रेती तस्कर गेल्या कित्येक दिवसांपासून या घाटातून रेतीचा उपसा करीत आहे. याबाबत वनविभाग, महसूल, पोलीस यांना सुचनासुद्धा केल्या आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. लोकमतने गुरुवारी या घाटाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा झाल्याचे दिसून आले.३० सप्टेंबरनंतर रेती घाटांवरील रेती उपसा करण्याची मुदत संपल्याने रेती तस्करांनी या नाल्याकडे नजर टाकली आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने त्या ठिकाणावरून ट्रॅक्टरसह मोठ्या मालवाहू गाड्यांनी रेतीचे वहन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून रात्रीच्या उपसा आणि वहनामुळे वन्यप्राण्यांना याचा त्रास होत आहे. यामुळे त्यांनीही आपला मोर्चा कचराळा आणि तिरवंजा या जंगल शेजारी असलेल्या गावाकडे वळविला आहे. काही दिवसापूर्वी तिरवंजा येथील एका वृद्धावर त्याचेच शेतात बिबट्याने हल्ला केला होता. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री जागली करीत नसल्याने रानडुक्कर उभे पीक उद्धवस्त करीत आहे. कचराळा हे गाव नाल्याला लागून असल्याने रात्रभर चालणाऱ्या ट्रॅक्टर व गाड्यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली आहे. याबाबत येथील काही नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अवैध रेती उत्खनाबाबत तहसीलदार सचिन कुमावत यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. परंतु हे काम पोलिसांचे असल्याचे सांगून त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. याची चौकशी करणे गरजेचे आहे.उच्च न्यायालयाच्या एका आदेशान्वये रात्री केली जात असलेली गौण खनिजाची चोरी पकडण्याचे काम हे पोलिसांचे असल्याचे सांगितले आहे.दिवसा होत असलेली चोरी महसूल विभागाचे कर्मचारी पकडत असतात. कचराळा येथील कुण्याही नागरिकाने आपल्याला भेटून या चोरी संदर्भात माहिती दिली नाही.- सचिन कुमावत, तहसीलदार, भद्रावतीकम्पाऊंडही उद्ध्वस्त महाऔष्णिक वीज केंद्राने रानडुकरांपासून सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी सौर उर्जेवरील विद्युत तारेच कम्पाऊंड तयार केले आहे. प्रवेशद्वारसुद्धा आहे. मात्र रेती तस्करांनी ते उद्ध्वस्त केले आहेत. गावपातळीवरील शासकीय हुद्यावर व समितीवर नेमून दिलेले पदाधिकारचीच आपल्या मालकीच्या टॅक्टरद्वारे रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची माहिती आहे.