Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 09:24 PM2020-11-30T21:24:19+5:302020-11-30T21:35:05+5:30

Chandrapur News DR. Sheetal Amte Suicide आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dr. The last rest should be at the feet of Baba who will take cold amte | Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

googlenewsNext
ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा होईल


प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पती आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डॉ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डॉ. शीतल या घरात पडून होत्या. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डॉ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना वरोरा शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला.

हायप्रोफाईल केस असल्यामुळे चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. नीलेश पांडे व ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी पोलीस ताफ्यासह आनंदवनातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानाची चौकशी केली. मात्र आत्महत्येबाबतचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. यानंतर चंद्रपूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या चमूने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनाही काही गवसले नाही. सायंकाळी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरूच होता.

डॉ. शीतल आमटे-करजगी मागील काही महिन्यांपासून नैराश्येत असल्याचे समजते. यातूनच त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून आनंदवनात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सोशल मीडियावरून पुढे येत होते. अलीकडच्या काळात डॉ. शीतल यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांच्या पत्नी ही मंडळी आनंदवनातून बाहेर पडली होती. यानंतर त्यांचे वडील डॉ. विकास आमटे हेदेखील आनंदवनात वास्तव्यास नव्हते. ही सर्व मंडळी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे राहत होती. दरम्यानच्या काळात डॉ. शीतल यांनी सोशल मीडियावर महारोगी सेवा समितीवर काही आरोप केले होते. यावर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करून या आरोपांचे खंडन केले. यासोबतच डॉ. शीतल यांना मानसिक ताण असून त्या नैराश्येत असल्याचे नमूद केले होते. एकूणच या घडामोडीतून डॉ. शीतल या एकाकी पडल्या होत्या असे लक्षात येते. अशातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना योद्धा म्हणून सत्कार
प्रशासनाने कोरोना विषाणूविरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे सामील होऊन कार्य केले. या कायार्बाबत १५ आॅगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे सत्कार करण्यात आला होता.

तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष तब्बल दोन तास चालले शवविच्छेदन
डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी आत्महत्या वा अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. कारेकर, डॉ. ढोबळे व डॉ. रामटेके या तीन तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी शवविच्छेदन सुरू झाले. ते रात्री ८ वाजतापर्यंत चालले. यानंतर ८ वाजून १५ मिनिटांनी मृतदेह वरोरा येथील आनंदवनकडे रवाना करण्यात आला.

आमटे कुटुंबीय आनंदवनात
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच आमटे कुटुंबीय गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून सायंकाळी आनंदवनात पोहचले. डॉ. शीतलचे वडील डॉ. विकास आमटे, आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांच्यासह डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, दिगंत आमटे ही मंडळी आनंदवनात येताच घरात गेली. त्यांनी या घटनेबाबत कुणाशीही संवाद साधला नाही.

Web Title: Dr. The last rest should be at the feet of Baba who will take cold amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.