डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेला स्वच्छतेचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:31+5:302021-02-05T07:35:31+5:30

बल्लारपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील विविध आस्थापनांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहरातील ...

Dr. Babasaheb Ambedkar Hindi Primary School Cleanliness Award | डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेला स्वच्छतेचा पुरस्कार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेला स्वच्छतेचा पुरस्कार

बल्लारपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील विविध आस्थापनांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहरातील विविध स्पर्धकांना २६ जानेवारीला ऐतिहासिक किल्ला परिसरात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शहरातील सर्व शाळांमधून नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेने पहिला पुरस्कार पटकाविला आहे.

या शाळेचे शिक्षक आर. आर. केसकर, घनशाम पारधी यांना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते शिल्ड व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ही शाळा सतत चार वर्षांपासून स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त करीत आहे. याशिवाय या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांमधून प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या हाॅटेल देशी तडका, बल्लारपूर, शासकीय कार्यालयांमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बाजार संघटनांमधून महात्मा गांधी संकुल, निवासी कॉम्प्लेक्समधून सारा रेसिडेंसी बल्लारपूर, रुग्णालयामधून डॉ. बानोत हाॅस्पिटल यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शासकीय कार्यालयांमधून नगर परिषद बल्लारपूरला या स्पर्धेत मात्र तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, हे विशेष. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक संगीता उमरे यांनी केले व आभार शब्बीर अली यांनी मानले. कार्यक्रमाला स्वच्छ सर्वेक्षणचे सुजित खामनकर, मंगेश सोनटक्के, अभिजार मिर्जा, अभिजित पांडे व नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Hindi Primary School Cleanliness Award