शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महासंघाचे जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खा. अशोक नेते, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. भद्रावती तहसील कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनिल आवारी, पांडुरंग टोंगे, निलेश देवईकर, रविकांत वरारकर, नितीन खरवडे, उमेश कांबळे, सचिन नक्षीने आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : लोकप्रतिनिधींच्या घरासमोर वाजविली थाळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसींच्या सवैधानिक मागण्याकरिता गुरुवारी जिल्हाभर थाली बजाव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संबधित प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.चंद्रपुरात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदु नागरकर, प्राचार्य सूर्यकांत खनके, सचिन भोयर, योगेश बोबडे, गणेश आवारी उपस्थित होते.ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खा. अशोक नेते, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. भद्रावती तहसील कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनिल आवारी, पांडुरंग टोंगे, निलेश देवईकर, रविकांत वरारकर, नितीन खरवडे, उमेश कांबळे, सचिन नक्षीने आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये, केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटी रुपये मंजूर करण्यात यावे, एस.सी., एस.टी. प्रमाणे सर्व अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करावी, ओबीसी शेतकरी शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागु करण्यात यावी, महाज्योती स्वायत्त संस्थेस लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ण्ध करून देण्यात यावा, बिगर आदीवासी लोकांना वनपट्टयासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन