शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व जिल्हा शैक्षणिक संघटना समन्वय समिती सुधाकर अडबाले शाळा बंदचे आवाहन केले होते.

ठळक मुद्देअधीक्षक आत्महत्या प्रकरण : विविध शिक्षक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक एस.एस.पवार यांनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शाळेतच आत्महत्या केल्याचा आरोप करीत दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, भद्रावती, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली, बल्लारपूर तालुक्यात शाळा शुक्रवारी कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. बंद दरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व जिल्हा शैक्षणिक संघटना समन्वय समिती सुधाकर अडबाले शाळा बंदचे आवाहन केले होते. या बंदला शुक्रवारी शाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरात विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात श्रीहरी शेंडे, लक्ष्मण धोबे, दिगंबर कुरेकार, प्रभाकर पारखी, रविंद्र बनपूरकर, अवधूत कोटेवार प्रा. अनिल डहाके, मराशिपचे रामदास गिरडकर, विज्युक्टाचे प्रा. खाडे, कॉस्ट्राईब मोरेश्वर बारसागडे, गणेश गेडाम आदींनी शाळा बंद आंदोलन केले. राजुरा तालुक्यातही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. समन्वय समितीच्या वतीने नायब तहसीलदार अमित बनसोडे यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात समन्वय समितीचे पदाधिकारी केशव ठाकरे प्राचार्य संभाजी वारकड, मुख्याध्यापक देवराव निब्रड, केवाराम डांगे, प्राचार्य दुर्योधन, इंदिरा येवले, सुधाकर उईके, राजू डाहुले, आनंद चलाख, अविनाश पिंपळशेंडे, प्रमोद कोडलकर ,प्राध्यापक मनीष पोतनुरवार, प्राध्यापक पाचभाई, प्राध्यापक मून, विलास उमरे, सुभाष शेंडे, प्रभाकर शेरकी, प्रभाकर साळवे, हिंगाणे, उपस्थिती होती. या आंदोलनात जिल्हा मुख्याध्यापक संघ, विजूक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती, प्रजासत्ताक शिक्षक संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचा सहभाग होता. गडचांदूर येथे सर्व खासगी आज दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Schoolशाळा