शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अध्यक्षांच्या कक्षाचे नूतनीकरणाचे काम नियमबाह्यच

By admin | Updated: March 31, 2017 00:42 IST

प्रत्येक अधिकाऱ्याला व पदाधिकाऱ्याला अधिकाराप्रमाणे खर्चाचे अधिकार असले तरी शासकीय नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

चंद्रपूर : प्रत्येक अधिकाऱ्याला व पदाधिकाऱ्याला अधिकाराप्रमाणे खर्चाचे अधिकार असले तरी शासकीय नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अध्यक्षांनी आपल्या कक्षाचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने अशी कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे नूतनीकरणाचे कामच नियमबाह्य असल्याचा प्रतिटोला जि.प.चे उपगटनेते रमाकांत लोधे यांनी लगावला आहे.रमाकांत लोधे यांनी म्हटले आहे, देवराव भोंगळे यांची २१ मार्च रोजी अध्यक्षपदी निवड झाली आणि २२ तारखेला कक्षाच्या नूतणीकरणाचे काम सुरु केले. याचा अर्थ काम सुरु करण्याअगोदर निविदेची जी प्रक्रिया करावी लागते, ती करण्यात आली नाही. या कामाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता घेण्यात आली नाही व पेपरनिविदा प्रक्रियाही करण्यात आली नाही. नियमाप्रमाणे तीन लाखांच्या वर काम असेल तर ई-टेंडर करावे लागते. एक लाख रूपये साहित्यावर खर्च होणार असेल तरीही ई-टेंडर करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. असे उघड असताना पदाधिकाऱ्याला अधिकार आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. या कामावरील अंदाजपत्रकाची प्रत मागितली असता, कार्यकारी अभियंत्यानी ती तयार नसल्याचे उत्तर दिले. याचाच अर्थ नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. पदाधिकाऱ्यांना किती अधिकार आहेत, हे अध्यक्षांनी समजून घेण्याची गरज व उत्तर देणे अपेक्षित होते. पण प्रक्रिया पूर्ण न करता काम सुरु करणे हुकूमशाही व भ्रष्टाचाराला वाव देणे जि. प. अध्यक्षांकडून झालेले आहे, असा आरोपही लोधे यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)