ब्रह्मपुरीतील उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:05+5:30

शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनानंतर ब्रम्हपुरी शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लॉकडाऊन ४ ते १० जूलैपर्यंत वाढविणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली. तीन दिवसाचे लॉकडाऊन शुक्रवारी संपणार आहे. आता त्यात वाढ करण्यात येणार असून १० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे.

District Collector reviews the measures in Brahmapuri | ब्रह्मपुरीतील उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

ब्रह्मपुरीतील उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Next
ठळक मुद्देआरोग्य तपासणीचे प्रमाण वाढवा : अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली कोरोनासंदर्भातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी ब्रम्हपुरी शहराला भेट देत संपूर्ण परिस्थिती पाहणी केली. दरम्यान, करण्यात आलेल्या उपायोजना संदर्भात माहिती जाणून घेतली.
तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरातील कन्टेनन्मेंट झोनला भेट दिली. ब्रह्मपुरी शहरामध्ये ९ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळले आहे.

संस्थात्मक कक्षालाही दिली भेट
रेणुकामाता चौक, भवानी वार्ड परिसरातील कन्टेन्मेंट झोन, कुर्झा वार्डातील संस्थांमक विलगिकरण कक्षाला भेट दिली. त्यानंतर खेड रोड येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी मंगेश वासेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुधपचारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक खाडे आदी उपस्थित होते.

१० जुलैपर्यंत ब्रम्हपुरीत लॉकडाऊन : क्रांती डोंबे
शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनानंतर ब्रम्हपुरी शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लॉकडाऊन ४ ते १० जूलैपर्यंत वाढविणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली. तीन दिवसाचे लॉकडाऊन शुक्रवारी संपणार आहे. आता त्यात वाढ करण्यात येणार असून १० जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे. मात्र या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूचे दुकान भाजीपाला, किराणा, कृषीवर आधारित खतांची दुकाने, मटण मार्केट आदी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय, मेडिकल हे जुन्याच वेळेप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

८० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले
१ जुलैला शहरातील ६९ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी ४६ जणांना अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यापैकी ५ व्यक्तींचे अहवाल दुसºयांदा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर गुरुवारी ८० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले.

Web Title: District Collector reviews the measures in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.