शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वितरण व्यवस्थेत आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ग्राहकांच्या मूलभूत हक्काचे होणार सवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्राहकाला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मूलभूत अधिकार आणि हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती करीत आहे. ग्राहकाने आपल्या मुलभुत हक्काप्रति नेहमी जागरुक राहावे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य गिरीधरसिंह बैस, वामनराव नामपल्लीवार, सदाशिव सुकारे तथा धान्य सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य उपस्थित होते.शासकीय कार्यालयीन अधिकारी नागरिकांना, अभ्यांगताना भेटत नाहीत. प्रश्न गांभीर्याने समजून घेत नाहीत. मराठी भाषेचा वापर होत नसून संवादात इंग्रजी शब्दाचा उच्चार करण्यात येऊ नये. अभ्यांगताकरिता राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सूचना फलकावर ठळक पणे प्रदर्शित करावे, अशा मागणी यावेळी केली.तक्रार केल्यास ७२ तासांत कार्यवाहीराज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आमच्याकडे करावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीतील तक्रारही न घाबरता नोंदवावी. ही तक्रार नोंदविल्यानंतर ७२ तासांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केल्या जात असल्याचे सांगून ते म्हणाले की चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास रोखले असता ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार त्यांनी यावेळी केले.जनतेच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवावा१८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय अन्वये शासकीय कार्यालयात जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३० ते ३.३० ही वेळ राखून ठेवावी व उपविभाग स्तरावर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ कालावधी, तालुका स्तरावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते ५ हा कालावधी अभ्यांगतासाठी राखून ठेवावा, असे ठरले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. याशिवाय अभ्यांगतासाठी राखून ठेवालेल्या कालावधीत अधिकाऱ्यांनी शक्यतो दौरा, बैठक आयोजित करु नये, अशी मागणीही सदस्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी