शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.च्या महिला- बाल कल्याण सभापतिपदी रोशन खान विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज होता. मात्र, सोमवारी निवडणुकीप्रसंगी वेगळेच चित्र बघायला ...

जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज होता. मात्र, सोमवारी निवडणुकीप्रसंगी वेगळेच चित्र बघायला मिळाले. भाजपच्या ३६ सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांनी बैठकीत रोशनी खान यांच्या नावाला विरोध दर्शविला होता. रोशनी खान यांचे नाव सोडून कोणत्याही सदस्याला सभापतिपदावर बसवावे, असे अनेक सदस्यांनी बोलून दाखविले. मात्र, नेत्यांनी रोशनी खान यांचे नाव सुचविल्यामुळे सदस्यांचा नाइलाज झाला होता. वरिष्ठांच्या आदेशाला झुगारून वैष्णवी बोडलावार यांनीही नामांकन दाखल केले होते. भाजपकडून रोशनी खान आणि बोडलावार तर काँग्रेसकडून स्मिता पारधी, नैना गेडाम यांनी नामांकन भरले होते. दुसरीकडे वनिता आसूटकर यासुद्धा नामांकन दाखल करण्यासाठी बैठकीतून जिल्हा परिषदेकडे निघाल्या. मात्र त्यांचे वाहन काही निष्ठावंत सदस्यांनी रोखून धरल्याने त्यांना तिथेच थांबावे लागले. दाखल केलेले नामांकन परत घेण्यासाठी भाजपच्या काही सदस्यांना वैष्णवी बोडलावार यांची मनधरणी करावी लागली. अखेर बोडलावारांनी व काँग्रेसकडून गेडाम यांनी नामांकन मागे घेतल्याने रोशनी खान विरुद्ध स्मिता पारधी अशी निवडणूक झाली. यामध्ये ३४ विरुद्ध ११ अशा मतांनी खान महिला व बाल कल्याण सभापतिपदी निवडून आल्या.

मतभेदामुळेच नामांकन ?

दीड वर्षापूर्वी भाजपचे पदाधिकारी विराजमान झाले त्यावेळी एकजूट होती. मात्र, हे सदस्य विखुरल्याचे आज दिसून आले. रोशनी खान यांचे नाव समोर करताच नामांकन दाखल करण्यापर्यंत प्रचंड विरोध झाला. याच संधीचा फायदा घेत वैष्णवी बोडलावार यांनी नामांकन दाखल केल्याची चर्चा आहे. भाजपकडून दोन्ही नामांकन कायम राहिले असते तर बोडलावारांना काँग्रेसच्या सदस्यांची मते मिळाली असती, असेही बोलले जात आहे.