शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शालेय धडा शिकवण्यासाठी शाळेत भरविले दगडांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:32 IST

Chandrapur News विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दगडांचा संग्रह बघता यावा व दगडांविषयीची माहिती समजून घेता यावी, याकरिता राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथ नुकतेच दगडांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थी व राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख व इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक बादल बेले यांच्या मार्गदर्शनात नुकतेच दगडांचे प्रदर्शन भरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजू सावित्रीबाईं मारोती भोयर, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात धोंडा नावाचा पाठ आहे. या पाठातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या दगडधोंडे संग्रहवृत्तीमुळे एक मोठा अनर्थ टळलेला होता. निरीक्षण क्षमता, प्रश्न विचारणे, संग्रह करणे, एखाद्या नवीन गोष्टीची माहिती समजून घेणे इत्यादी बाबींचा या पाठात समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दगडांचा संग्रह बघता यावा व दगडांविषयीची माहिती समजून घेता यावी, याकरिता हे प्रदर्शन भरविले होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका जयश्री धोटे यांनी मानले.२ हजार दगडांचा संग्रहराजू भोयर यांनी सन २००५ पासून दगड संग्रहाला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल दोन हजार दगड त्यांच्याकडे आहेत. यात विविध आकार, पक्षी-प्राण्यांची चित्र असलेले, इंग्रजी अक्षरे असलेले, धातुमिश्रित, चुनखडीचे, एकात एक मिश्रित आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या दगडांचा समावेश आहे, तर काही दगडांमधे विजेच्या प्रकाशात वेगवेगळे रंग दिसतात. अशा विविध प्रकारचे दगड प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना बघता आले, त्याची माहिती समजून घेता आली. जीवनात एका तरी गोष्टीचा छंद आपण जोपासला पाहिजे. संग्रह करायला अनेक क्षेत्र खुली आहेत. आपण आपली आवड लक्षात घेऊन आपले छंद जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन राजू भोयर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Schoolशाळा