शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज

By admin | Updated: October 11, 2016 00:52 IST

६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा १५ व १६ आॅक्टोबरला उत्साहात साजरा होणार असून या सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे.

चंद्रपूर : ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा १५ व १६ आॅक्टोबरला उत्साहात साजरा होणार असून या सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा आयोजित करण्यात येत असून यावर्षी ही दोन दिवस उत्तासाहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.१५ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विश्वशांती बंधुत्व प्रेरीत वाहनासह शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक प्रारंभ होऊन दीक्षाभूमीवर विसर्जित होणार आहे. सायंकाळी ६ वाजता धम्मध्वजारोहण होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची उपस्थिती राहणार आहे. यानंतर धम्मज्योत प्रज्वलन होणार असून भदंत नंदवर्धनबोधी महाथेरो अध्यक्षस्थानी तर वण्णास्वामी महाथेरो, भिक्खू धम्मनाग थेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी ६.४० वाजता उद्घाटन होणार असून भदंत नंदवर्धन बोधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, भदंत डॉ. वण्णास्वामी महाथेरो, भदंत डॉ.मेतानंद महाथेरो, भदंत संदावरा महाथेरो, भदंत सयादेव महाथेरो, भदंत उत्तम महाथेरो, भदंत सुंदरा महाथेरो, भदंत ज्योतीला महाथेरो, भदंत तेजानिया महाथेरो, भदंत अगासरा महाथेरो, भदंत अंगुरो महाथेरो, भदंत विरिया महाथेरो, भदंत जिताराम महाथेरो, भिक्खू धम्मनाग थेरो, भिक्खू धम्मघोष मेत्ताथेरो आदी उपस्थित राहणार आहेत.रात्री ८ वाजता जागर समतेचा हा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता तथागत भगवान सम्यक सबुद्ध आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातूकलशासह आणि पथसंचालनासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १.३० वाजता सामुहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन होणार असून धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षस्थानी राहतील, यावेळी प्रा.डॉ. नंदवर्धन बोधी, डॉ.वण्णास्वामी महाथेरो, भिक्खू धम्मनगा महाथेरो, भिक्खू धम्मसारथी, भिक्खू बोधीरत्न, भिक्खू नागवंश, भिक्खू नागाघोष, आदी उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता मुख्य समारंभ होणार आहे.मुख्य समारंभाला येणार रामदास आठवलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून होझान अलन सेनाईके केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, अल्पसंख्याकविभागाचे प्रधानसचिव शाम तागडे, धम्मचारी मैत्रेयनाथ, धम्मचारी वीरधधम्म, जॅनस आर्सस आदींची उपस्थिती राहणार आहे.