चंद्रपुरात १४ वर्षांखालील १०० वर मुलांना मधुमेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:07 AM2019-01-20T04:07:04+5:302019-01-20T04:07:10+5:30

चंद्रपुरात दोन दिवस घेण्यात आलेल्या आरोग्य महामेळाव्यात १०० वर लहान मुले मधूमेह आजाराने ग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

Diabetes in children below 100 under the age of 14 in Chandrapur | चंद्रपुरात १४ वर्षांखालील १०० वर मुलांना मधुमेह

चंद्रपुरात १४ वर्षांखालील १०० वर मुलांना मधुमेह

Next

चंद्रपूर : चंद्रपुरात दोन दिवस घेण्यात आलेल्या आरोग्य महामेळाव्यात १०० वर लहान मुले मधूमेह आजाराने ग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या रुग्णांना दररोज इन्सुलिन व सिरींजचा खर्च करावा लागतो. काही रुग्णांना महिन्याकाठी दोन हजारांपर्यंत खर्च येत आहे. या रुग्णांना केंद्र शासनाने मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करून मंजूर व्हावा, यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.हा आजार केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नाही, तर देशात सर्वत्र आहे. हा प्रस्ताव शासनाने मान्य केल्यास त्याच धर्तीवर देशातील मुलांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो. ही मुले कशी जगतात. याबाबत महाआरोग्य मेळाव्यात त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ वयोगटापर्यंत असलेली मधुमेह झालेली मुले स्वत: इन्सुलिन घेतात. यातील अनेक मुले गरीब कुटुंबातील आहेत.

Web Title: Diabetes in children below 100 under the age of 14 in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.