शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांनी चंद्रपूरचा चेहरा बदलला

By admin | Updated: February 28, 2017 00:34 IST

विकासाची दृष्टी, प्रबळ ध्येय आणि कर्तृत्वाची जोड या त्रिसूत्रीचा अवलंब करुन चंद्रपूरमहानगराचा चेहरामोहरा बदलून ...

हंसराज अहीर : विविध विकास कामांचे भूमिपूजनचंद्रपूर: विकासाची दृष्टी, प्रबळ ध्येय आणि कर्तृत्वाची जोड या त्रिसूत्रीचा अवलंब करुन चंद्रपूरमहानगराचा चेहरामोहरा बदलून विकासाभिमुख व सोयी- सुविधांची सुसज्ज अशा महानगराची उभारणी करण्याच्या दिशेने भाजपाने पाऊल उचलले आहे. फक्त अडीच वर्षांच्या काळात चंद्रपुरात रस्ते, वीज, पाणी या मुभलूत गरजांबरोबरच ओपनस्पेसचे, चौकांचे, उद्यानांचे ऐतिहासीक तलावाचे सौंदर्यीकरण केले.महानगरवासीयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महापौर, नगरसेवक सदैव तत्पर राहून आपले कर्तव्य बजावतील, असे अभिवचन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.ओमनगर व छत्रपती नगर येथे खासदार व आमदार स्थानिक विकास निधीतंर्गत प्रस्तावित रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, भाजपा नेते सुभाष कासनगोट्टूवार, मोहन चौधरी, नगरसेवक रवींद्र गुरनुले, नगरसेविका रत्नमाला वायकर, माया उईके, प्रमोद शास्त्रकार, संजय खनके, श्रीकांत भोयर, सोपान वायकर, सुनील डोंगरे यांची उपस्थिती होती.यावेळी ना. अहीर म्हणाले की, चंदपूरला महानगराचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात या शहरात होणारा विकास हा संपूर्ण राज्यात अग्रेसर आहे. ‘सबका साथ, सबका विकास’, हा दृष्टिकोन ठेवत या विकासाची वाटचाल सुरु आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अमिन भाई, विठ्ठल डुकरे, हरिश्चंद्र भाकरे, सुधाकर बोंडे, पवन भुते, मधुकर सपाटे, छदामीलाल विश्वकर्मा, मुकुंद उगे, पुष्पा शेंडे, नीलेश मोहोड, कल्पना बहीरम, ऋषी दोनाडकर यांच्यासह वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)