शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर प्रणालीतून चंद्रपूर महानगराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदायिक विकासात आपले दायित्व द्यावे वाटेल, अशा व्यवहारिक टीडीआर (टॉन्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) प्रणालीचा विकास ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर स्मार्ट शहर करण्यासाठी नवा विकास आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये घरे बांधण्यासाठी जागा कमी आहे. मात्र कमी जागेमध्ये सुंदर शहराची रचना करण्यासाठी जनतेला नवीन घरकूल कायदा व धोरणांमार्फत सुविधा व संधी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेला आवडेल आणि शहराच्या सामुदायिक विकासात आपले दायित्व द्यावे वाटेल, अशा व्यवहारिक टीडीआर (टॉन्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) प्रणालीचा विकास करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.चंद्रपूर येथे ‘क्रेडाई’ (कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशियशन आॅफ इंडिया) या विकासकांच्या संघटनेतर्फे चंद्रपूर शहर विकास आराखडा आणि हस्तांतरण विकास हक्क (डेव्हलपमेंट प्लॅन आॅफ चंद्रपूर सिटी अ‍ॅन्ड ट्रॉन्सफरेबल डेव्हलपमेन्ट राईट) या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, क्रेडाईचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, सचिव संतोष कोलेट्टीवार आदी उपस्थित होते.सध्या चंद्रपूर महानगर पालिका ‘ड’ वर्गात मोडते. पालिकेच्या उत्पनाच्या स्त्रोतांना मर्यादा आहे. त्यामुळे विकास कामे करताना अडचणी असतात. अशाच अडचणी या ठिकाणच्या गृहनिर्माण क्षेत्रातही आहे. २० वर्षा पूर्वीच्या विकास आराखड्याला बदलवण्याची वेळ आली आहे. नवीन सरकार आल्यानंतर विकास आराखडयात आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागांचे महत्व वाढले असून या ठिकाणी विकास करताना टीडीआर नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.चंद्रपूर शहरात १५६ आरक्षित जागा आहेत. या सर्वाना टीडीआर कायदा समजून सांगावा लागेल. मालकांचा महानगरपालिकेचा आणि या शहराचा यामध्ये कसा फायदा आहे, हे पटवून द्यावे लागेल. वाढलेला एफएसआय आणि बदलेले टीडीआर धोरण यामुळे नव्या विकासाच्या वाटा कशा पध्दतीने उपलब्ध झाल्यात, हे सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले.केवळ ८.६२ टक्के निवासी जागाकार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी विकास आराखडा व टीडीआर या संदर्भातील सादरीकरण केले. चंद्रपूर शहरामध्ये केवळ ८.६२ टक्के निवासी जागा शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध असणाºया जागांमध्ये आता उंच इमारतींशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.