वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:59+5:302021-02-11T04:29:59+5:30

दोन वर्षांपूर्वी किमान वेतनाच्या दरानुसार निविदा प्रक्रिया काढण्यासाठी निधी मंजूर केली. परंतु, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारामुळे ५०० कामगार वंचित आहेत. ...

Dera agitation of contract workers in medical colleges continues | वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरूच

दोन वर्षांपूर्वी किमान वेतनाच्या दरानुसार निविदा प्रक्रिया काढण्यासाठी निधी मंजूर केली. परंतु, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारामुळे ५०० कामगार वंचित आहेत. सात महिन्यांचे थकीत वेतनही मिळाले नाही. डॉ. सुरपाम व प्रशासकीय अधिकारी राठोड यांनी थकीत वेतन व किमान वेतनाबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्यामुळे निश्चित तारीख देता येणार नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. दरम्यान, बुधवारी आमदार किशोर जोरगेवार, इंटकचे कामगार नेते के. के. सिंग यांनी डेरा आंदोलनाला भेट दिली. आंदोलनकर्त्या कामगारांसोबत सहभोजन केले. यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख चंद्रमा यादव, राकाँचे नगरसेवक दीपक जयस्वाल, महानगर महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, मनसेचे शहराध्यक्ष मनदीप रोडे, अविनाश लांजेवार, जंगलू पाचभाई, देवा कुंटा उपस्थित होते.

Web Title: Dera agitation of contract workers in medical colleges continues