शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकार्‍यांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास

By admin | Updated: June 7, 2014 23:52 IST

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असतानाही केवळ त्रास देण्याच्या हेतूने येथील उपविभागीय अधिकारी विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देताना १९६७ चा पुरावा मागत आहे.

चंद्रपूर : ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असतानाही केवळ त्रास देण्याच्या हेतूने येथील उपविभागीय अधिकारी विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देताना १९६७ चा पुरावा मागत आहे. यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाचे कोणतीही निर्देश नसतानाही केवळ त्रास देण्यासाठी सदर प्रमाणपत्र मागत आहे. यासंबंधी ओबीसी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून सदर अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सध्या बारावी तसेच इतर परीक्षांचे निकाल लागले आहे. त्यामुळे जातीचे, नॉनक्रिमिलेअर, उत्पन्न आदी प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र आहे. मात्र नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्याने ते प्रमाणपत्र काढण्यासाठी जात आहे. मात्र येथील उपविभागीय अधिकारी विद्यार्थ्यांंना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देताना १९६७ चा पुरावा जोडण्यास सांगत आहे. सदर पुरावा जोडण्याचे शासनाचे कोणतेही आदेश नाही. तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकडे जर, जातीचे प्रमाणपत्र असेल तर, त्यांना १९६७ चा पुरावा जोडण्याची गरज नाही. तरीही त्रास देण्याच्या उद्देशाने सदर अधिकारी विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र न देता वापस पाठवित आहे. हा विद्यार्थ्यांंवर अन्याय असून एखादा विद्यार्थी प्रमाणपत्राअभावी शिक्षणापासून वंचित राहिल्यास, जबाबदार कोण, असा प्रश्नही ओबीसी कृती समितीने जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. सदर प्रकार त्वरित थांबवून ज्या विद्यार्थ्यांंकडे जातीचे प्रमाणपत्र आहे. त्यांना १९६७ चा पुरावा मागू नये, अशी मागणी करण्यात आली. यासंबंधात ओबीसी कृषी समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात ओबीसी कृती समितीचे जिल्हा संयोजक सचिन राजूरकर, विदर्भ संघटक बबनराव फंड, मनोज पोतराजे, राहुल बेले, दिनकर सिनगारे, महेश सामनपल्लीवार, राहूल पावडे, डॉ.भगत, प्रवीण चवरे, राजू रेभनकर, रवी लोणकर यांच्यासह सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)