शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची अनामत रक्कम बँँकेत जमा होणार

By admin | Updated: October 8, 2015 00:40 IST

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची परत मिळणारी अनामत रक्कम उमेदवारांच्या नावे चेकद्वारे तर निवडणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांचा मोबदला ...

ग्रामपंचायत निवडणूक : तक्रारींना बसणार लगामप्रवीण खिरटकर  वरोरानुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची परत मिळणारी अनामत रक्कम उमेदवारांच्या नावे चेकद्वारे तर निवडणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात यावर्षी प्रथमच जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्कम मिळाली नाही किंवा कमी मिळाली याबाबतच्या तक्रारींना लगाम बसणार आहे.निवडणुकीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे काम संपल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ त्यांचा मोबदला देण्यात येतो. परंतु मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना पाच वर्षांचा कालावधी लोटुनही आजतागायत मोबदला मिळालेला नाही. मात्र तरीही यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर होते. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यल्प रक्कम तालुकास्तरावर प्राप्त झाल्यानंतर ती वाटण्यात आली. त्यानंतरही रक्कम प्राप्त झाली नसल्याने निवडणुकीत सहभागी अनेक कर्मचारी मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत मोबदला मिळणार की नाही, याबाबत कर्मचारी सांशक होते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात आला होता. मात्र यामध्ये मोबदला घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत येत्या कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या प्रारंभीच सहभागी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत मागविणे सुरू केले आहे.