शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा परिसरातील दर्जेदार कापसाला अमेरिकेत ‘डिमांड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देखरेदीसाठी सामंजस्य करार : शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ

प्रवीण खिरटकर।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यात उत्तम दर्जाचा कापूस उत्पादन पिकतो. या कापसाला अमेरिकेत मागणी वाढू लागली. परिणामी, अमेरिकेतील इंडो काउन्ट इंडस्ट्रीजच्या वतीने दर्जेदार कापूस खरेदीसाठी यंदा पहिल्यांदाच येथील पारस अ‍ॅग्रो प्रोसेससोबत सामंजस्य करार करण्यात आला. यासंदर्भात नुकतीच एक कार्यशाळाही पार पडली. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस उत्पादन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रकल्पातंर्गत प्रत्येक गावात १० प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागतिक निकषानुसार येथील कपाशीला मागणी वाढू लागल्याने खरेदीसाठी अमेरिका सरसावली. मार्डा मार्गावरील पारस अ‍ॅग्रो प्रोसेसरच्या आवारात कापूस संरक्षण, गुलाबी बोंडअळी व कीटकनाशक फवारणी विषयावर जागृती शिबिर घेतले. या उपक्रमासाठी कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन टेक्सटाईल्स इंडस्ट्रिज, इको कॉटन इंडस्ट्रिज लिमिटेड मुंबई व बीसीआय कॉटन आदी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी इंडो कॉटन इंडस्ट्रिज लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास लालपुरिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जीटीसी सिरकोट नागपूरचे डॉ. एस. के. शुक्ल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. जाजु, महाराष्ट्र कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापक जे. पी. महाजन, केबीके कुटचे कृषी शास्त्रज्ञ आशुतोष लाटकर, एस. आर. घोरपडे, प्रकाशचंद्र मुथा, जी. एम. बैराळे, रूपेश तंवर, डॉ. तुषार धुले, हरिश राठी, प्रितम कोरे, अमोल मुथा आदी उपस्थित होते. यावेळी शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन जी.एच. वैराळे यांनी केले. कार्यक्रमाला कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.१० गावे घेणार दत्तककापूस उत्पादन ते पक्का माल एकाच ठिकाणी तयार व्हावा. यातून शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, हा सदर कराराचा हेतू आहे. या प्रकल्पाला ‘गगन’ हे नाव देण्यात आले. प्रकल्पातंर्गत १० गावे दत्तक घेण्यात येणार आहेत. या गावांमध्ये सामाजिक उपक्रमांसोबतच कापूस लागवड, आंतरमशागत आदी विषयांसाठी १० प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. शेतकºयांना मोफत आरोग्य उपचार व रूग्णवाहिकाही उपलब्ध देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती