लांब अंतरावरील बसफेऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:22+5:302020-12-04T04:56:22+5:30

नळयोजना सुरू करा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु ...

Demand for long distance bus service | लांब अंतरावरील बसफेऱ्याची मागणी

लांब अंतरावरील बसफेऱ्याची मागणी

नळयोजना सुरू करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नाल्यांच्या पात्रात झुडपे वाढली

चंद्रपूर : तुकूम ते उर्जानगर मार्गावरील नाला तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी येथे वाघ दिसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे या झुडपांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शौचालयाया अभावी नागरिकांची गैरसोय

कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालय व्यवस्था नसल्याने कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुर्गम भागात रस्ता बांधण्याची मागणी

जिवती : तालुक्यातील आंध्र- महाराष्ट्र सीमेवर असलेले काही गावांत पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गावात रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for long distance bus service