शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र सदस्यांचा निर्णय घेण्यास विलंब

By admin | Updated: April 20, 2015 01:21 IST

येथून जवळच असलेल्या वाढोणा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत गृहकराचा भरणा न केल्याने त्यांना अप्पर आयुक्त, ...

तळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या वाढोणा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत गृहकराचा भरणा न केल्याने त्यांना अप्पर आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांनी अपात्र घोषित केले. मात्र हा निर्णय जाहीर करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लोटून गेला. त्यामुळे अपात्र ठरविण्यात आलेले ग्रा.पं. सदस्य गावात दिमाखाने मिरवित आहेत. प्रशासनाच्या निर्णयाला विलंब का? असा संतप्त सवाल ग्रामस्थानी तळोधी (बा.) येथे आयोजित पत्रकारपरिषदेत उपस्थित केला. पत्रकार परिषदेला नागभीड- तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रुपेश डोर्लीकर यांच्यासह वाढोणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी सक्तीने करवसुली करतात. परंतु सत्तेची चव चाखणारे पदाधिकारी मात्र वेळेवर कराचा भरणा करीत नाहीत. ही बाब लक्षात घेवून ११ जुलै २०१३ ला रुपेश डोर्लीकर यांनी ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम १४ (ह) व १६ नुसार अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली. आणि तब्बल नऊ महिन्यांनी ५ मे रोजी संबंधित सदस्यांना अपात्र घोषित केले.अपात्र सदस्यांनी अपर आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल केले. त्यावर अपर आयुक्तांनी सदर निर्णयाला स्थगिती देवून प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी ठेवले. त्यानंतर ३० डिसेंबर २०१४ च्या निकाली आदेशानुसार चोकेश्वर दादाजी झोडे, रंजना अभय मुत्तेलवार, मेघा रुपचंद वाघाडे, शोभा सुरेश सयाम, अरविंद रामभाऊ कावडे यांनी वेळेवर कराचा भरणा न केल्याने सदस्यत्व रद्द घोषित केल्याची माहिती दिली. मात्र सदर निकालाची प्रत २४ मार्च २०१५ म्हणजे निकालानंतर चार महिन्यांनी ग्रामपंचायत सचिवांना संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली. यामुळे वाढोणा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिनियमातील बाबींना न्याय द्यायला एवढा उशिरा लागत असेल व अपात्र सभासदाचा कार्यकाळ असाच निघून जात पदावर राहण्याची संधी मिळत असेल तर न्यायव्यवस्थेवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला (वार्ताहर)