शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या जागृतीसाठी रस्त्यावर लिहिली घोषवाक्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही.

ठळक मुद्देसावली नगर पंचायतीचा उपक्रम : विनाकारण बाहेर जाऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात, असा सल्ला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना सावली नगर पंचायतीने दिला. शहरातील म. फुले चौक, बाजार चौक येथील रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावली नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात २९ मार्चपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा दिली असून त्यांना पास देण्यात येत आहेत.बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाईअत्यावश्यक कामासाठी बाहेर निघण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. मात्र अनेकजण दुचाकी, किंवा पायदळ बाहेर निघत आहेत. तसेच चौकात बसत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात चौकात नाकाबंदी करण्यात येत असून कारवाई करण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाचे पथकसुद्धा शहरात फिरत असून कारवाई करीत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. त्याच्या अमंलबजावणीसाठी सावली नगर पंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. आता जनजागृतीची उपाययोजना म्हणून रस्त्यावर घोषवाक्य लिहिण्यात आले आहेत.- मनीषा वजाळे, मुख्याधिकारी नगर पंचायत, सावली

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस