शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

नियमाला डावलून मातीचे ढिगारे

By admin | Updated: June 4, 2014 23:38 IST

कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे

चंद्रपूर : कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे केले आहेत. कोळसा उत्खननानंतर निघणारी माती कुठे व कशी टाकावी, याचे काही आदर्श नियम आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतापासून एक किलोमिटर अंतरावर असे ढिगारे उभे करावे, असे संकेत आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी नदीच्या काठावरच हे ढिगारे उभे करण्यात आले आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होतच आहे, सोबतच नदीच्या पात्रात माती साठली जाऊन नदीचे पात्र अनेक ठिकाणी उथळ झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पुराचाही धोका वाढला आहे. मातीचा ढिगारा उभा करताना तो खचू नये, यासाठी बेंचेस तयार करावे लागतात. मात्र वेकोलिकडून अनेक ठिकाणी हा नियमच पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकदा ढिगारे खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोळशाचे उत्खनन करताना जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर बाहेर येते. वेकोलिकडून त्याचा साठाही केला जातो. त्यावर प्रक्रीया केल्यानंतरच तो नदीच्या प्रवाहात सोडला जावा, असे संकेत आहेत. मात्र या संकेताना वेकोलिकडून कायम मुठमाती दिली जात आहे. प्रक्रीया न करताच ते दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह प्रदूषित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि आणि खासगी अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. असे असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. पर्यावरण कायद्यानुसार अनेक नियम व अटी या कोळसा खाणींना घालून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पालनच होताना दिसून येत नाही. कोळशाच्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोळशावर आधारिक उद्योग वा खाण परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे नियमित सिंचन केले जावे, असा एक नियम आहे. परंतु अनेक उद्योग व वेकोलिच्या कोळसा खाण प्रशासनाकडून या नियमाचे पालनच केले जात नाही.