शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 18:59 IST

मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली.

ठळक मुद्देमूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली.

मूल : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर क्षेत्रात मूल तालुक्यातील डोणी येथील जंगलात जखमी असलेल्या वाघिणीवर उपचार करण्यासाठी गेलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शनिवारी मृत्यू झाला. या वाघिणीवर वनकर्मचारी पाळत ठेवून होते. दरम्यान आज सकाळी वाघिणीवर देखरेख करणारे वनकर्मचारी जंगलात गेले असता त्यांना वाघीण मृतावस्थेत आढळली.

मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली. यामध्ये 5 वर्ष वयाची वाघीण जखमी झाली. यामुळे ती अस्वस्थ आल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तिच्यावर उपचार करण्यासाठी 3 जून रोजी पशुवेधकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे गेले होते. वाघिणीवर उपचार करण्यासाठी तिच्याकडे जात असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान वाघिणीवर पाळत ठेवलेल्या वनकर्मचाऱ्यांनी वाघीण असलेल्या ठिकाणी जाऊन बघितले असता ती मृतावस्थेत दिसून आली. वनकर्मचाऱ्यांनी ही माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे  उपसंचालक जी. गुरुप्रसाद, बफर क्षेत्राचे सहा.वनसरक्षक जाधव, मूल बफर क्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर, जाणाळाचे क्षेत्र सहा. ए. एस. कोसरे यांनी भेट दिली. वाघिणीवर चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून तिचे दहन करण्यात आले. 

 

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प