शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

सिलिंडरच्या स्फोटात पीठगिरणीसह घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक्त घर जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. गडचांदूरवरून अग्नीशमन पथकाला पाचारण करण्यात आले.

ठळक मुद्देगावकरी गेले गावशिवाबाहेर : दुचाकी, मालवाहू ऑटोही जळाला

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : येथून सात किमी अंतरावरील कुंबेझरी येथील नारायण चतरु पवार यांच्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या आगीत त्यांचे घर पुर्णत: जळून खाक झाले. डोळ्यादेखत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. आगीच्या डोंबातून घरातील सदस्य कसेबसे बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक्त घर जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. गडचांदूरवरून अग्नीशमन पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र हे वाहन यायला बराच विलंब लागला. या आगीत आपलेही घर तर जळणार नाही ना म्हणून गावातील अनेकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गावशिवाबाहेर पळ काढला. जेव्हा आग आटोक्यात आली, त्यावेळी नागरिक परत आले.२३ लाखांचे नुकसानबुधवारी सकाळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन जळालेल्या घराचा पंचनामा केला. घरासह सामान असा एकूण २३ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत हिरोची नवीन दुचाकी, मालवाहतूक ऑटो, पीठगिरणी, टीव्ही, फ्रीज, कुलर, शेतीपयोगी बि- बियाणे, अवजारे, महत्त्वाचे कागदपत्र,किराणा सामान सर्व भस्मसात झाले.

टॅग्स :fireआग