उसपार चक येथे रिकाम्या जागेवर अतिक्रमण

By Admin | Updated: June 25, 2015 01:13 IST2015-06-25T01:13:46+5:302015-06-25T01:13:46+5:30

तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.

Crossing on empty space in Chak here | उसपार चक येथे रिकाम्या जागेवर अतिक्रमण

उसपार चक येथे रिकाम्या जागेवर अतिक्रमण

सिंदेवाही : तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ग्रामपंचायत उसपार चक रेव्हणी आबाधी मधील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शेणखताचे खड्डे हटविण्यात आले. काही दिवसांनी दामोधर मेश्राम यांना घर बांधणीसाठी लेआऊट टाकून दिला. नवीन वस्ती (अबाधी) मध्ये मोतीराम मेश्राम यांनी गुरांच्या गोठ्यासाठी जागा मिळावी म्हणून काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. ग्रामपंचायत जागा उपलब्ध नाही, असे अर्जावर नमूद केले होते.
ग्राम पंंचायत अबाधीचा विचार केला असता, नवीन वस्तीमध्ये बहुतके नागरिकांचे जागेवर अतिक्रमण आहे. याकडे ग्रामपंंचायत दुर्लक्ष करून भविष्यात शालेय ग्राऊंड, शासकीय इमारत, गाळे बांधकामास उपयोगात येणारी जागा ग्राम पंचायत कमिटीने आपल्या मर्जीतील व्यक्तीला देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांंमध्ये रोष पसरला असून एकास न्याय व दुसऱ्याला अन्याय का, असा सवाल नागरिक करीत आहेत. टाकण्यात आलेले लेआऊट त्वरीत हटवून ती जागा राखीव करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Crossing on empty space in Chak here