दुग्ध विकास विभागाच्या गाय खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By Admin | Updated: December 18, 2014 00:48 IST2014-12-18T00:48:34+5:302014-12-18T00:48:34+5:30

दुग्ध विकास विभागाच्या नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट कार्यरत असून प्रत्येक प्रोजेक्टरवर ४६ लाख रुपये खर्च करण्यात आला.

Crores of corruption in cow milk procurement of milk development department | दुग्ध विकास विभागाच्या गाय खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

दुग्ध विकास विभागाच्या गाय खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

बी.यू. बोर्डेवार राजुरा
दुग्ध विकास विभागाच्या नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट कार्यरत असून प्रत्येक प्रोजेक्टरवर ४६ लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र या प्रोजेक्टपैकी अनेक प्रोजेक्टमध्ये गाईच नाही. याशिवाय अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास येत आहे.
नागपूर विभागातील एका दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने पुणे येथील कंपनीला एका वस्तुच्या खरेदीसाठी दोन वेळा धनादेश दिला आहे. श्रीकृष्ण दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेस पुरवठा केलेल्या एक हजार लिटर क्षमतेच्या बल्क कुलरसाठीे चार लाख १२ हजार ८०० एवढया रकमेची ज्यादा उचल करण्यात आलेली असल्याचे पत्र पुणे येथील कंपनीला जिल्हा दुग्धशळा विकास अधिकारी यांनी अनेक वेळा पाठविले.
दोन वेळा एकाच वस्तुसाठी पाठविलेल्या धनादेशाचा क्रमांक ९७०९११ आणि ९७०९४० असा आहे. प्रत्येक वेळा चार लाख १२ हजार ८०० चा धनादेश देण्यात आला आहे. राज्यामध्ये दुग्ध विकास होऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा, यासाठी राज्य शासनाने नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट तयार केले.
प्रत्येक प्रोजेक्टवर ४६ लाख रुपये खर्च केला. परंतु अनेक ठिकाणी प्रोजेक्टरची अवस्था वाईट असल्याच्या तक्रारी आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेने अंतर्गत नागपूर विभागातील दुग्ध प्रकल्पाची फेर तपासणी करण्याची गरज आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे.

Web Title: Crores of corruption in cow milk procurement of milk development department