शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले.

चंद्रपूर : शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. मात्र सदर नहराचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शेतपिकांना मिळत नसल्याने या भागातील धानपीक करपून गेले आहे. नहराचे पाणी रयतवारी गावापर्यंत आल्यानंतर पुढील गावांपर्यंत ते पाणी पोहचतच नाही. शेतपिकांना मिळतच नाही. परिणामी, या परिसरातील धानपीक सुकत चालले आहे. सुरुवातीच्या काळात या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळत होते. मात्र आता नहराचे पाणी सोडण्याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने जाम (बु.) येथील खुशाल लोडे रमाकांत चरडुके, ज्ञानदेव हुलके, नकटु उंदिरवाडे, बोनुजी थोरात, दिवाकर थोरात, रसिका गायकवाड, महेंद्र चुनारकर, निनाजी चरडुके, नीळकंठ घडसे, राजेंद्र फाले, मधुकर भिवनकर, उमाजी फाले, शंकर पुंजारे, अनंतराव झाडे, संजय पाल, नामदेव चुधरी, मोरेश्वर मुत्तेमवार, धनू लाडे, गंगाधर बाबनवाडे यांच्या शेतातील धान पीक करपले असून यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. शासनाने करून दिलेल्या सिंचनाच्या सोईचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सध्या या नहराचे पाणी सोडल्या जात असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह केवळ मात्र या गावापासून काही अंतरावर असलेल्या जाम (बु.) गावासह परिसरालगतच्या शेतपिकांनाही नहराचे पाणी पोहोचत नसल्याने धानपीक करपत आहे. नहराचे पाणी ज्यादा प्रमाणात सोडण्यात यावे, अशी मागणी रायुकॉंचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)