वाढोणा येथे क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:43+5:302021-01-03T04:29:43+5:30

वाढोणा : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे संकल्प क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्व. निखिलभाऊ डोर्लीकर यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ लाँग पीच ...

Cricket tournament at Wadhona | वाढोणा येथे क्रिकेट स्पर्धा

वाढोणा येथे क्रिकेट स्पर्धा

वाढोणा : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे संकल्प क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्व. निखिलभाऊ डोर्लीकर यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ लाँग पीच क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील विजेता वाढोणा येथील संकल्प ११ संघ तर नवरगाव येथील आरएसके उपविजेता ठरला. तृतीय आर्यन्स मेंढा (किरमेटी) संघाने पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन विकास डोर्लीकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लांजेवार, मुर्लीधर बोरकर, टेमदेव लांजेवार, विठ्ठल गजबे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप येसनसुरे ,रामू वाघाडे , गुलाब आत्राम, संजय मदनकर उपस्थित होत. स्पर्धेचे बक्षीस वितरण एकनाथ बंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वी. के. अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय डोर्लीकर, प्रकाश कामडी, किशोर नेवारे, बाबुराव येसनसुरे, दिनेश पगाडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संकल्प क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वाढोणाचे अध्यक्ष शुभम डोर्लीकर, उपाध्यक्ष सचिन बुरबांधें, सचिव ओकार लांजेवार, सहसचिव आदित्य बोरकर आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Cricket tournament at Wadhona