शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॉन’ तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन नियोजन करीत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सार्वत्रिक निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याकरीता ज्याप्रकारे ॲक्शन प्लॉन तयार केला जातो, त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा ॲक्शन प्लॉन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने इत्यंभूत माहिती आतापासून तयार करावी. 

ठळक मुद्देअजय गुल्हाने : तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेनंतर आता संभाव तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पहिल्या दोन लाटेचा अनुभव लक्षात घेता भविष्यात कोविड उपाययोजनेसंदर्भात आणखी सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही लाटेला थोपविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ॲक्शन प्लॉन’ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात सर्व तालुकास्तरीय यंत्रणेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेताना दिले.यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार-कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम उपस्थित होते. तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन नियोजन करीत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सार्वत्रिक निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याकरीता ज्याप्रकारे ॲक्शन प्लॉन तयार केला जातो, त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा ॲक्शन प्लॉन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने इत्यंभूत माहिती आतापासून तयार करावी. यात आपापल्या तालुक्यातील खासगी रुग्णालयांची संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची यादी, विलगीकरणासाठी लागणाया शासकीय इमारती, खासगी सभागृहे, मंगल कार्यालये, आतापर्यंत खासगी उद्योगांनी कोविडमध्ये केलेली मदत, कोविड केअर सेंटर, डेडीकेडेट कोविड हेल्थ उभारण्यासाठी जागांचा शोध आदींचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्टिंग होणे गरजेचे आहे. यात आयएलआय व सारीच्या रुग्णांची टेस्टिंग, पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो-रिस्क काँन्टॅक्ट, सुपर स्प्रेडर, नरेगाच्या बांधकामावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मजूर, गोसेखुर्दच्या बांधकाम साईड्स, विविध तालुक्यात असलेल्या मोठमोठ्या कंपन्यातील मजूरवर्ग यांचा समावेश असावा. तसेच नियमांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्टिंग व्हायलाच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. 

प्रत्येक तालुक्यात जागृतीस्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनामार्फत गावस्तरावर लसीकरण आणि सर्व्हेक्षण समितीचे नियोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला व्हिसीच्या माध्यमातून सर्व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी (न.प), गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.

लसीकरणाच्या अफवांना बळी पडू नकाकोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरण हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेली लस ही अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून समोर यावे. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी तीन महिन्यांनी लस घ्यावी. स्तनदा मातांसाठी सुध्दा लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी संबंधित व्यक्ती रक्तदान करू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या