शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

१६ गावातील कापूस मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील १६ गावांमध्ये परतीच्या पावसाने कपाशीच्या बोंडे सडली. त्यामुळे पांढरे सोने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. कापूस वेचणीला आला असताना दोन आठवड्यांपासून खंडित स्वरूपात परती पाऊस पडला. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धीडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली व बबापूर परिसरातील कपाशीची बोंडे सडली.दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले. संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. यंदा सहा एकर शेतात कपाशीची लागवड केली. परंतु परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली.उत्पन्नाची हमी राहिली नाही. लागवडीचा खर्च निघेल की नाही हा प्रश्नच आहे, अशी खंत आर्वी येथील शेतकरी जयपाल कपाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.धान उत्पादकांचे बजेट कोलमडलेब्रह्मपुरी : यंदा धान शेतीसाठी समाधानकारक पाऊस आल्याने पिकाची जोमाने वाढ होऊन धानाचा निसवा व्यवस्थित झाला. समाधानकारक उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असताना अकाली पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली. गुरूवारच्या वादळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. त्यामुळे धानाला आता अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. धान कापलेल्या बांधात पाणी साचले. शेतकऱ्यांना यंदा जादा उत्पादनाची अपेक्षा होती. हलक्या धानाची कापणी केल्यानंतर शेतकरी जड धान कापन्याच्या तयारी करत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसला. भातशेती हेच तालुक्यातील मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे आर्थिक बजेट धानपिकावर अवलंबून असते. परंतु अवकाळी पावसामुळे वर्षभराचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती