शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची कापूस विक्री लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगाम करण्यास पैशाची अडचण निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देकवडीमोल भावात कापूस खरेदी : सीसीआयची कापूस खरेदी संथगतीने

प्रकाश काळे / जयंत जेणेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राजुरा, कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी भरून ठेवलेल्या कापसाला खासगी बाजारपेठेतील व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. तर दोनही तालुक्यातील सीसीआयला कापूस विक्रीसाठी शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. परंतु एका दिवशी सीसीआयला मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाड्या सोडत असल्याने राजुरा, कोरपना तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले हाल संपायला तयार नाही.खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा व कोरपना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सात हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त राजुरा येथे १३ ते १४ तर कोरपना येथेही मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाड्या सीसीआयला विक्रीसाठी परवानगी देत असल्याने कापूस विक्रीसाठी नंबर येण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांना मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील जिनिंगवर सीसीआयची कापूस खरेदी अतिशय संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची कापूस विक्री लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगाम करण्यास पैशाची अडचण निर्माण होणार आहे. खासगी बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत कवडीमोल भावात लुटले जात आहे.त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी साीसीआयला कापूस विकण्यासाठी मोठया प्रमाणात शासकीय नियमानुसार नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता कापूस विक्रीसाठी अनेक दिवसाची बहुप्रतिक्षा करावी लागणार आहे.शेतकऱ्यांकडे सध्या बँकांचे कर्ज भरण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी केविलवाणा होऊन नाईलाजाने खासगी व्यापाºयांना कापूस विकत आहे.त्यामुळे तेलंगणा राज्यातील बहुतांश शेतकरी कोरपना तालुक्यातील खासगी व्यापाºयांना कापूस विक्री करीत आहे. कापूस खराब असल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी दोन हजार रुपयांपासून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.राजुरा येथे साडेसात हजार तर कोरपनात आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणीदेशावर कोरोनासारख्या महाभयानक महामारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सुरू झालेली सीसीआय खरेदी बंद करावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने सीसीआयला कापूस खरेदी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार राजुरा येथे केवळ एकाच जिनिंगवर तर कोरपना तालुक्यात ४ जिनिंगवर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आठ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातचसध्या राजुरा व कोरपना येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. परंतु ही कापूस खरेदी अतिशय संथगतीने असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत आहे. मोठया प्रमाणात शेतकºयांनी नोंदणी केल्यामुळे तोकडी जिनिंगसंख्या असलेल्या कापूस संकलन केंद्रावर एवढ्या मोठया प्रमाणात असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घेणे शक्य नाही. बहुतांश शेतकºयांचा कापूस अजूनही घरातच भरून आहे. याकडे लोकप्रतनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.राजुरा येथे सध्या एका जिनिंगवर सीसीआय कापूस खरेदी सुरू असून राजुरा येथील अन्य जिनिंगवर कापूस खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना कोणतीही अडचण जाणार नाही.-कवडू पोटेकृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरा

टॅग्स :cottonकापूस