शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मनपाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

ठळक मुद्देएकाच दिवशी १२४ लोकांवर कारवाई : २४ हजार ८०० रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी यासंबंधीचे निर्देश दिले असून त्यानुसार चंद्रपुरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकांनी बुधवारी व गुरुवारी शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या १२४ नागरिकांवर कारवाई करीत २४ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे.त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणाºयांना २०० रुपये दंड लावण्याची कारवाई सुरु केलेली आहे.याची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरू केली आहे. प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे बुधवारी ४२ नागरिकांवर कारवाई करून आठ हजार ४०० रुपये दंड व गुरुवारी ८२ नागरिकांवर कारवाई करून १६ हजार ४०० रूपयांचा दंड असे दोन दिवसात एकूण १२४ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण २४ हजार ८०० रुपयांचा दंड पथकांनी वसूल केला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.झोननिहाय कारवाईझोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करून ८४०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला ३ मॉस्कसुद्धा देण्यात आले.गडचांदुरात तीन दिवसात ८४५ जणांवर कारवाईगडचांदूर नगर परिषदेच्या वतीने तीन दिवसात ८४५ नागरिकांवर मास्क न लावता फिरत असताना कारवाई केली. प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला. सदर कारवाई नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक स्वप्नील पिदूरकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद वाघमारे, संतोष गोरे, संतोष करदोडे, साहील कुलसंगे, सचिन खनके यांनी केली.प्रभागनिहाय तीन पथकेसहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनच्या स्वच्छता निरीक्षकांद्वारेही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात एक असे तीन पथक तैनात केले आहेत. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मॉस्क लावून ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या