शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आली.

ठळक मुद्देमाणुसकीची शोकांतिका : मनपाचे कर्मचारी करीत आहेत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून मृताला शेवटचा निरोप देता येतो. विशिष्ट अंतर राखून कुटुंंबाच्या धार्मिक विधीही पूर्ण करता येतात. मात्र, जागृतीचा अभाव व गैरसमजांमुळे रक्ताच्या नात्याकडून त्यांना नाकारण्याच्या घटना शहर व जिल्ह्यात घडत आहेत. अशा काळात मनपा कर्मचारी तसेच सरपंच, पोलीस व काही जागरूक नागरिकांकडून मृतांवर अंत्यसंस्कार केल्या जात आहेत.कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आली. चंद्रपुरात महानगर पालिकेचे कर्मचारी हे कार्य करीत आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारले तरी मृतदेहाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करीत आहेत,  अशी माहिती चंद्रपूर मनपा पथकातील एका कर्मचाऱ्याने दिली.

सरपंच,पोलीस पाटलांचा मोठेपणाग्रामीण भागातही कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करीत नसल्याचे चित्र आहे. कोरोनापूर्वी अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे काम म्हणून नागरिक मदतीला धावून यायचे. कोरोनामुळे माणुसकी आटली. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सरपंच व पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी पुढे येत आहेत. 

पाच व्यक्तींना परवानगी पण मृतांच्या नशिबी तेही नाहीकोरोना बाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी पीपीई किट घालून पाच व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. परंतु, काही कुटुंब आपले रक्ताचे नातेही पाळत नाही. ‘तुम्हीच अंत्यसंस्कार करा, आम्ही येऊ शकत नाही’ असे म्हणून प्रतिसाद देत नाही. चंद्रपूर शहरात मार्च महिन्यात अशा घटना घडल्या आहेत. शासनाने परवानगी देऊनही मृतांच्या नशिबी तेही येत नाही. त्यामुळे महानगर पालिकेचे कर्मचारी जणू देवदूत म्हणून कर्तव्य बजावत आहेत. 

मृताच्या नातेवाईकांनी घाबरू नये. पीपीई किट घालून आपल्या स्नेहीजनाला शेवटचा निरोप देता येतो. खबरदारी घेऊन आपल्या धार्मिक प्रथा, परंपराही पाळता येतात. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.- एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर 

मृतदेहापासून दूर उभे राहून दर्शन घेता येते. आम्ही अशा कुटुंबांना मनाई करीत नाही. मात्र, नियमांचे पालन केले पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू वेदनादायीच आहे. पण, गैरसमजापासून दूर राहून अखेरचा निरोप दिला पाहिजे.एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या