शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचारी संघटनेचे पार पडले अधिवेशन

By admin | Updated: February 11, 2015 01:08 IST

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अधिवेशन ....

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी होते. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, प्रमुख अतिथी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा परिषद महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल, विभागीय उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, माजी कार्याध्यक्ष गजानन शेट्टे, विभागीय सहचिटणीस लीलाधर पाथोडे, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी र.ग. कर्णिक यांचे व्यक्तिमत्व, संघटनेचे कार्य व जबाबदारी, नागरिकांच्या अपेक्षा, नवीन आव्हाने तसेच शासन उपक्रम याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय ठाकरे यांनी टिम वर्क, सामाजिक उपक्रमात सहभाग, सकारात्मक दृष्टीने करावे लागणारे प्रयत्न याबद्दल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात लिलाधर पाथोडे, चंद्रहास सुटे आदींनी आपले विचार व्यक्त केले.मार्गदर्शक अशोक थुल, सुनील जोशी यांनी परिभाषित अंशदायी निवृत्ती योजनेवर समस्या व समाधान आणि संघटनेपुढील भविष्यातील आव्हाणे या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन शेट्टे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव, अंशदायी निवृत्ती योजना, संपाची भुमिका, संघटनेचे महत्व, १०० टक्के वर्गणी जमा करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी तर दुसऱ्या सत्रातील प्रास्ताविक रमेश पिंपळशेंडे यांनी केले. संचालन प्रकाश गंटावार, माधुरी संतोषवार यांनी केले. आभार जयदिप साधनकर, सुर्यभान झाडे यांनी मानले. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)