शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वादंग

By admin | Updated: December 29, 2016 02:13 IST

येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष डॉ.

चंद्रपूर : येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार यांच्या विरूद्ध संचालकांनीच एकत्रीत येवून विरोधाचा सूर लावला. संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेणे आणि तत्कालीन सीईओ रमेश दुब्बावार यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून या बैठकीत बरीच गरमागरमी झाल्याची माहिती आहे. संचालकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांनी बैठक आयोजित केल्याने संचालक नाराज होते. याच दरम्यान अध्यक्ष डॉ. आर्इंचवार यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दुब्बावार यांना निलंबित केले. निलंबनाची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित केली. याबद्दल बैठकीत संचालकांनी नाराजी व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून अध्यक्ष आईंचवार आणि सीईओ दुब्बावार यांच्यात फारसे पटत नव्हते. यामुळे हा वाद वाढत जावून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले. मात्र त्याची कल्पना संचालकांना नव्हती, त्याचे पडसाद या बैठकीत उमटले. २७ डिसेंबरला झालेल्या या बैठकीत अध्यक्ष विरूद्ध सर्व संचालक अशी स्थिती निर्माण झाली होती. सूत्रानुसार, या बँकेचे संचालक असतानाही रमेश मामीडवार हे सदस्य असलेल्या सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट, चंद्रपूर या संस्थेला चार वर्षांपूर्वी अडीच कोटी रूपयांचे कर्ज देण्याचाही मुद्दा या बैठकीत गंभीरपणे चर्चेेस आला. हा व्यवहार नियमानुसार झाला नसल्यास त्यांना संचालक पदावरून हटविले जावे, अशीहीे मागणी करण्यात आली. अखेर हा विषय ताणून धरण्यापेक्षा सामंजस्याने मार्गी लावण्याचे ठरले. याच वेळी दुब्बावार यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्याचेही बैठकीत ठरले. संचालकांच्या दबावामुळे डॉ. आर्इंचवार यांनी दुब्बावार यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र रमेश दुब्बावार यांनी स्वत: राजिनामा द्यावा, अशी अट डॉ. आर्इंचवार यांनी ठेवली. यावर संचालकांनी स्विकृती दर्शविल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अध्यक्षांशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मात्र बैठकीतील एका संचालकाने आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर या घटनेला दुजोरा दिला. (जिल्हा प्रतिनिधी)