शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेचा संदेश देणारा सोहळा

By admin | Updated: October 18, 2015 01:11 IST

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा हा समता, बंधुभाव व राष्ट्रीय ऐक्याची प्रेरणा देणारा असून ...

चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा हा समता, बंधुभाव व राष्ट्रीय ऐक्याची प्रेरणा देणारा असून यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला हा सोहळा सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १६ आॅक्टोबर २०१५ रोजी या भोजनवितरण कार्यक्रमाचा शुभारंभ भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ना. अहीर बोलत होते.याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, भाजपाचे जिल्हा महासचिव राजेश मून, वनिता कानडे, सभापती अंजली घोटेकर, जि.प. सदस्य विजय वानखेडे, अनुप चिवंडे, सुभाष कासनगोट्टूवार, जितेंद्र धोटे, संतोष वडपल्लीवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यानिमित्त आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमास उपस्थित सर्व अनुयायींना शुभेच्छा दिल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आयोजित अन्नवितरण कार्यक्रम ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्य भावना बाळगून केलेली कृती आहे. दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जात असून तो सातत्य ठेवून आयोजित केला जाईल, असे त्यांनी सांगितले. समाजातील शोषित, पीडित लोकांच्या कल्याणासाठी महामानव डॉ. बाबासाहेबांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांनी राष्ट्राला अर्पण केलेली घटना सामाजिक न्यायाची प्रतिक ठरली, असेही ते म्हणाले.इंदू मिलमध्ये अंतरराष्ट्रीय किर्ती लाभेल अशा प्रकारचे डॉ. बाबासाहेबांचे स्मारक राज्य शासनाने उभारण्याचे कार्य चालविले असून ते या देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वांना प्रेरणा देणारे स्मारक ठरेल, असेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)