शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री भ्रूण हत्या रोखणे सामूहिक जबाबदारी

By admin | Updated: March 26, 2015 00:53 IST

लिंग निदान ही समाजाला लागलेली कीड असून मुलगी वाचविणे तसेच स्त्री भ्रूण हत्या रोखणे ही सामुहिक जबाबदारी आहे.

चंद्रपूर : लिंग निदान ही समाजाला लागलेली कीड असून मुलगी वाचविणे तसेच स्त्री भ्रूण हत्या रोखणे ही सामुहिक जबाबदारी आहे. भविष्यात सामाजिक असमतोल बिघडू नये यासाठी सर्वांनी मिळून लिंग निदान प्रक्रियेला प्रतिबंध घालत लेक वाचविण्याची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडावी, असे मत महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालय व महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका सभागृहात आयोजित पीसीपिएनडीटी अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ.रजणी हजारे, अ‍ॅड.मेघा महाजन व अ‍ॅड.विजया बांगडे उपस्थित होते.समुचित प्राधिकारी व सल्लागार समिती सदस्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन डॉ.श्रीराम गोगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुला-मुलींचे प्रमाण पाहता भविष्यात ही समस्या गंभीर रुप धारण करेल, अशी परिस्थिती आताच दिसत असल्याचे महापौर म्हणाल्या. समाजाने आपली भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास स्त्रीभृण हत्या थांबविण्यास मोठी मदत होईल असे डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण यावर आरोग्य विभाग अभ्यास करत असून अहवाल लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लिंग निदान करण्याची मानसिकता अधिक असल्याचे सांगून गोगुलवार म्हणाले की, हे लोन आता ग्रामीण भागाकडे सरकत आहे. ही बाब सामाजिक असमतेला खतपाणी घालणारी आहे. आपल्या अवती भोवती लिंग निदान होत असल्याचे दृष्टीस येताच समाजाने जागल्याची भूमिका बजाविणे गरजेचे असल्याचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सांगितले. पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी शासन करत असून कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाही केली जाईल, असा इशारा डॉ.मुरंबीकर यांनी दिला.प्रास्ताविक डॉ.अंजली आंबटकर यांनी केले. आभार बोरीकर यांनी मानले. या कार्यशाळेस समुचित प्राधिकारी, सल्लागार समिती सदस्य, समाज सेवक व डॉक्टर मोठया संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)